रविवार २१ ऑक्टोबर २०१२

खांडेकर चाळीसी...

खांडेकर चाळीसी...

1) जगात सर्व गोष्टी मानसाला योग्य वेळी कळतात. झाडांना काही पानांबरोबर फुले व फुलांबरोबर फळे येत नाहीत.
2) मानुस शरीरावर प्रेम करतो. त्या प्रेमाला अंत नसतो. पण शरीर काही त्याच्यावर असे प्रेम करत नाही. प्रसंगी ते त्याचे वैर साधते.
3) सुंदर दिसणाऱ्या आणि गोड असणाऱ्या फळात किड आढळते. जिवन असेच आहे. ते सुंदर आहे, मधुर आहे. पण त्याला केव्हा कोठून किड लागेल याचा नेम नसतो.
4) जिवनाचं रहस्य नेहमीच गुहेत लपलेलं असतं. त्या गुहेच्या दारातून आत जावून आतल्या काही न दिसणाऱ्या अंधारातून आपल्यापैकी प्रत्येकाला हे रहस्य स्वतःच शोधून काढले पाहीजे.
5) मानवी मनाची आणि जिवनाची गुंफण मोठी विलक्षण आहे. त्यामुळे सुख हा अनेकदा मृगजळाचो शोध ठरतो.
6) सुख ही दुखःची छाया आहे, की दुःख ही सुखाची सावली हे न उलगडलेलं कोडं आहे.
7) रुपवती स्त्री जशी विनयानं शोभून दिसते. तसेच अर्थ आणि काम हे धर्माच्या संगतीत सुंदर वाटतात.
8) या जगात जन्माला येणारा प्रत्येक जीव शापीत असतो. कुणाला पुर्वजन्माचं कर्म भोवतं, कुणाला आई बाबांच्या दोषाची फळं चाखावी लागतात, कुणी स्वभावदोषामुळे दुःखी होतात तर कुणाला परिस्थितीच्या शृंखलात बद्ध होवून जिविताचा प्रवास करावा लागतो.
9) जिवन हा अनेक शापांनी युक्त असा एक वर आहे.
10) मृत्यू हे एक मोठे अस्वल आहे. कितीही उंच झाडावर चढून बसले, तरी ते मानसाचा पाठलाग करते. कुठेही लपून बसा, ते काळे कूरुप प्रचंड धुड आपला वास काढत येते. त्याच्या गुदगुल्यांनी प्राण कंठाशी येतात.

11) मृत्यू हा अष्टौप्रहर अश्‍वमेध करणारा विजयी सम्राट आहे. याला जगात कोणी विरोध करु शकत नाही.
12) लज्जा हा सौंदर्याचा अलंकार आहे. सत्याचा नाही. सत्य हे नग्न असते. नुकत्याच जन्माला आलेल्या बालकाप्रमाणे.
13) बायकांचं लक्ष पुरुषाच्या जिभेकडं नसतं, ते डोळ्यांकडे असतं !
14) मानसाने जिवनाच्या मर्यादा कधी विसरु नयेत.
15) यौवन म्हणजे वार्धक्‍यातली पहिली पायरी. मृत्यू ही वार्धक्‍याची शेवटची पायरी.
16) वृक्षवेलीची मुळे जशी जवळच्या ओलाव्याकडे वळतात, तशी मानसे सुखासाठी निकटच्या लोकांचा आधार शोधतात. याचाच जग कधी प्रेम म्हणतं. कधी प्रिती तर कधी मैत्री पण खरोखरच हे आत्मप्रेम असते.
17) द्वंद्वपूर्ण जिवणात तत्वज्ञान हाच मानवाचा अंतिम आधार आहे.
18) या जगात जन्माला येण्याचा एकच मार्ग आहे. पण मरणाचं तसं नाही. तो अनेक वाटांनी येतो. कुठूनही येतो.
19) मृत्यू हा जीवन मात्राला जितका अप्रिय तितकाच अपरिहार्य आहे. तो सृष्टीच्या जन्मानइतकाच नाट्यपूर्ण आणि सहस्यमय भाग आहे.
20) सौंदर्याची पुजा हा "स्त्री'चा धर्म आहे. ती कुठल्याही सुंदर वस्तूचा नाश करु शकत नाही.

21) जो घाव घालतो, त्याला तो विसरुन जाणं सोपं असतं. पण ज्याच्या कपाळावर घाव बसतो, त्याला त्याचा कधीच विसर पडत नाही.
22) प्रिय व्यक्तिचा तिच्या दोषांसह स्विकार करण्याची शक्ती खऱ्या प्रेमाच्या अंगी असते. असली पाहिजे.
23) जिवनात प्रेम ही एक उच्च भावना आहे. पण कर्तव्य ही तिच्यापेक्षाही श्रेष्ठ अशी भावना आहे.
24) आपल्यासाठी दुसऱ्याच्या डोळ्यांत आलेले अश्रू पाहण्यात अपूर्व आनंद असतो.
25) डोळ्यांत अश्रू येणे हे दुबळ्या मनाचे लक्षण आहे.
26) विचारांच्या सहाय्याने विकारांवर विजय मिळविण्यातच खरा पुरुषार्थ मनुष्यधर्म आहे.
27) दैव मोठं लहरी आणि निर्दयी आहे. ते एका क्षणात आकाशातील उल्केला पृथ्वीवरला पाषाण करुन सोडते.
28) कुणाचंही दुखः असो. ते कळण्याचा मार्ग या जगात एकच आहे. तो म्हणजे त्याच्या जागी आपण आहोत, अशी कल्पना करणे.
29) जी नदी तहानेनं व्याकूळ झालेल्या मनुष्याची तृष्णा शांत करते, तिच पुढे खोल पाण्यात गेला की त्याचा प्राण घेते.
30) ज्याचा आत्मा स्वार्थाच्या वासनांच्या आणि भोगांच्या आहारी जातो, तो मनुष्य या जगात सदैव दास्यात खितपत पडतो.

31) स्त्रीयांच्या बरोबर चिरकाल स्नेह राहणं शक्‍य नसते. कारण त्यांची ह्दयं लांडग्याच्या हृदयासारखी असतात.
32) पापाचा विषवृक्ष विश्‍वव्यापी असतो. त्याची पाने मोहक दिसतात. त्याची फुलं धुंद करुन सोडतात. पण त्याची फळं.... त्याच्या प्रत्येक फळात तक्षक लपुन बसलेला असतो. त्याचा दंश कुणालाही केव्हाही होवू शकतो.
33) दुःखाचे सात समुद्र ओलांडल्याशिवाय आनंदाचे कधीही न सुकणारे फुल मानसाला मिळू नये, असा जिवनाचा नियम आहे की ?
34) मानुस हा देव आणि राक्षस यांचा विचित्र संकर आहे.
35) संयोग आणि वियोग यांच्या अद्भुत रसायनालाच जीवन म्हणतात का ?
36) समुद्राच्या किनाऱ्यावर लहान मुलं वाळूचा किल्ला बांधतात. भरतीची एक लाट येते आणि तो किल्ला कुठच्या कुठं नाहिसा होवून जातो. त्या वाळूच्या किल्ल्यापेक्षा मानसाचे जीवन काय निराळे आहे ?
37) जे जीवन वाट्याला आलं आहे, ते आनंदानं जगणं... त्या जिवनातील रस किंवा सुगंध शोधनं, तो सर्वांना आनंदानं देणं हा सुखी होण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे.
38) निराशेपेक्षा खोटी आशा फार वाईट असते.
39) जिवनाच्या जमा खर्चात उधारीला जागा नाही. जो आज सुगंधी फुलांचा वास घेत नाही. त्याला तो उद्या मिळेलच असे नाही. या जगात उद्याची सोनेरी सकाळ उगवेल, उद्याची सोनेरी फुले फुलतील पण त्या उद्याच्या जगात हा वास घेणारा असेलच असे नाही.
40) जीवन क्षणभुंगुर आहे. या जगात कोणत्या क्षणी मानसाला मृत्यू येईल याचा नेम नाही. म्हणून आपल्याला मिळणारा प्रत्येक क्षण हा मानसाने सुवर्णक्षण मानला पाहिजे. त्यातला रस, सुगंध आनंद अगदी कठोरपणे पिळून घेवून मानसाने आपली सुखाची तृष्णा शांत केली पाहिजे.

ययाती - वि. स. खांडेकर

बुधवार २७ जुलै २०११

जे. बी. पाटील राजिनामा प्रकरण

1.7.2005


पंधरा दिवसांची प्रतिक्षा आज संपली. रुम मिळाली. पाच सहा रुम नंतर हे घर योगायोगाने पाच मिनिटात नक्की झाले. 300 रुपये महिना भाडे ठरले आहे. जेवणाची सोय तर 900 रुपये महिना प्रमाणे यापुर्वीच झाली आहे.


आज प्राथमिक शाळेत व दत्त मंदीरात वृक्षारोपन केले. प्रा. जाधव सर इथे प्राचार्य आहेत. ताईच्या कॉलेजचे प्राध्यापक व हे जाधव दोघेही एकमेकांची कार्बन कॉपी आहेत. झाडे लावल्यावर चहा पाणी घेवून रुमवर आलो.


आता बाकी सर्वजण फिरायला गेलेत. मी रुमवर थांबलोय. संध्याकाळचे सात वाजलेत. दोन वर्षांना बरोबर 15 दिवस बाकी असताना माझी ही डायरी लिहून संपकेय. आता उद्या नवीन डायरी घ्यावी लागेल. आता ही डायरी म्हणजे संतोष डुकरेचा इतिहास झाली आहे. इतिहासाच्या या 200 पानांना बाय बाय...


----------------


29.6.2005, येगाव


अजून रुम न मिळाल्याच्या टेन्शनमध्ये एक मोठी घटना लिहायची विसरुनच गेलो. सोमवारी 20.6 ला कॉलेज सेंटरला रिपोर्टिंग केले. सावर्डेतून पत्र पोस्ट केले व येगावला आलो.


मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजता रुपेशचा फोन आला. फोनवर त्याने जी.बी. पाटील सरांनी सरळगावला त्यांच्या व फुड सायन्सच्या प्राचार्यांच्या भांडणातून आपल्या पदाचा राजिनामा दिला असून आपल्या सर्वांना त्यांना पाठिंबा देण्यासाठी सरळगावला जायचे आहे, तु कुटरे, नांदगाव, आंबतखोल व येगावच्या सर्व मुलांना घेवून लगेच सावर्ड्यात ये आम्ही सर्वजण जमलो असून बाकीच्यांना फोन करुन बोलावले आहे, असे सांगितले. नक्की भांडण कशाने झाले ते काही माहित नाही. तेव्हा लवकर या असे म्हणून फोन ठेवला.


एवढी बातमी समजल्यावर आम्ही सहा जण प्रथम जेवून काय करावे ते करावे म्हणून दिलीप काकांकडे जेवायला गेलो. मंदार व मी सावर्डेला जावून नक्की काय ते पाहावे असे ठरवले. जेवून मी व मंदार कुटरेला नवनाथच्या रुमवर गेलो. तेथे ढगे व जग्या आले होते. त्यांना बातमी सांगून लगेच सावर्डेला यायला सांगून आम्ही नांदगावला आबाच्या रुमवर आलो. ते जेवून सर्वजण निघतो म्हणाले.


हायवेला येवून आम्ही रुपेशला फोन केला तर तो सावर्डे रेल्वे स्टेशनवर होता. पावणे दोन वाजले होते व दोन वाजता ट्रेन निघणार होती. आम्ही दहा मिनिटात स्टेशनवर पोचलो. ट्रेन दीड तास लेट येणार होती. सुधाकरचा गृप, आमचा गृप, नायशी व वडेरचे गृप सोडून बाकी सगळेजण आले होते. कडूस चा गृप ला सांगण्यासाठी व आणण्यासाठी मी व शेलिमकर गाडी घेवून गेलो. गाडी सुधाकरच्या रुमवर लावली. व सव्वा तीन वाजता आम्ही स्टेशनवर पोचलो. नायशी व वडेरुचे गृप मागून येत आहेत. नांदगाव व आंबतखोल निघाले आहेत, असे समजले.


साडेतीनला आम्ही सर्वजण येगाव 2, कुटरोचो दत्ता, मुक्‍या, नांदगावचे 5, बाबा 6, रुप्या 6, तिवटे 6, सहाणे 3, युवराजचे 7 बाकी नायशी व वडुरेचे रात्री प्रवास करुन बुधवारी सकाळी सरळगावला पोचले. तर आम्ही त्यांच्या आधी रात्री 11 वाजता पोचलेलो होतो. कल्याण सरळगाव जीपने आलो. येताना 40 अधिक 30 अधिक 10 असे 80 रुपये खर्च झाले. रात्री व दुसर्या दिवशी सकाळचे जेवण कॉलेजच्या मेसला पडवळ व घोलपच्या नावावर गेस्ट म्हणून जेवलो. त्यामुळे ते 40 रुपये वाचले.


दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता आम्ही सर्वजण कॉलेजवर गेलो. जे. बी. पाटील सरांसोबत चर्चा केली. बाकी सर्वजण सरांजवळ असताना मी नवीन बिल्डींग पहायला म्हणून तेथून बाजूला सटकलो. तर मध्येच लिखितकर सर व दवांग सर भेटले. त्यांच्याबरोबर रस्त्यातच अर्धा तास सरांची भांडणे, रावे, रावेनंतर काय, मैत्री, भविष्य आदी विषयांवर बोलणे झाले. नंतर मी एक एक लॅब पाहत सर्वत शेवटच्या खोलीत शिरलो. आत प्राचार्य सरोदे सरांची केबीन होती. मी लगेच मागे फिरलो, मात्र सरांनी स्वतःहून हाक मारली. मी गेलो.


त्यानंतर आमच्यात एक तास चर्चा झाली. रावे सोडून इकडे कशाला आलात, इथं घडलेलं कुणी कळवलं, वावरे, शेख इ. सरांनी कुणी फोन केला होता का, राजीनाम्याचं नक्की कशामुळं झालं, अहंकार, मी पणा, पावर, त्यांचा अनुभव, समज-गैरसमज, तरुण मुलांचा भावनीकपणा व त्यांच्या भावना भडकून घेतला जाणारा फायदा, मुलांचा अविवेकीपणा, रावेच्या अडचणी (गाडीच्या) इ. अनेक विषयांवर चोथा पडेपर्यंत चर्चा झाली. शेवटी त्यांनी त्यांच्या संपर्कात रहायला सांगितले.


त्यांना भेटून मी रावेचे जुने रिपोर्ट गोळा करण्यासाठी जे. बी. सरांच्या केबीनमध्ये गेलो. जे.बी. सरांना माझ्यात व सरोदे सरांमध्ये चर्चा सुरु असल्याची खबर आधीच लागली होती. त्यांनी सरोदे सर काय म्हणत होते म्हणून विचारले. त्यावर मी थोडक्‍यात चर्चेचा सार सांगितला. त्यावर ठीक आहे म्हणून विषय संपवला. त्यानंतर हॉर्टीकल्चरच्या एकमेव रिपोर्ट साठी सोमकुवर मॅडमला मस्का लावून तो मिळवला. लिखितकर सरांनी त्यांचा रिपोर्ट स्वतःहून काढून दिला. बाकी सर्व रिपोर्ट जे. बी. पाटलांकडून घेतले. सध्या सर्व मुलांमध्ये फक्त माझ्याकडेच जुने सर्व रिपोर्ट आहेत. याच दिवशी रात्री आठ वाजता सावर्डेला येण्यासाठी आम्ही निघालो.


कल्याण-ठाणे तेथून हॉलिडे एक्‍सप्रेसने चिपळून. मग येगाव असा प्रवास दुसर्या दिवशी सकाळी आठ वाजता पुर्ण झाला. 300 रुपये खर्च झाले. एखा दिवसाची विकलीला अबसेंटी लागली. कडूस वरुन गाडी घेवून येगावला आलो. रावे पुन्हा सुरु झालाय....


--------------


26.6.2005, येगाव, चिपळून.


कितीही प्रयत्न केला तरी मी डायरी सलगपण लिहू शकत नाही. सारखा गॅप पडतोय. येथे येवून दहा दिवस झालेत पण अजून घर मिळालेले नाही. पाहू उद्या परवा तेरवा मिळेल. या सेमच्या सुरवातीला मी मागील बाकी 9000 व या सेमचे 15 हजार चेकने एक जुलैच्या जमा केले आहेत. चेकचे 15 हजार रुपये दादा एक तारखेआधी बॅंकेत जमा करणार आहेत.


10 तारखेला माझे लायसन ट्रायल आहे. त्यामुळे मी आठ तारखेला नक्की घरी जाणार आहे. पाहू काय होतेय ते...बहुतेक उद्या राकेश व अमर चव्हाण म्हशी पाहण्यासाठी कोल्हापूरला जात आहेत. त्यांच्याबरोबर इतर तीन चार जण जातील. पण मी आणि दिलपाक इथेच थांबणार आहोत.


------------


19.6.05, येगाव, चिपळुन.


रेन बो गृपच्या सर्व मैत्रिणींना संतोषचा नमस्कार आणि स्मिताला विशेष दंडवत लवून मुजरा. (रागानं नाक फुगवू नकोस, तुम्हा सर्वांमध्ये मला फक्त तुझीच टिंगल करायला आवडतं.) येताना तुम्हा सर्वांना भेटून यायचं मनात होतं पण शक्‍य झालं नाही.


आम्हाला कॉलेजपासून 30 किलोमिटर व गोवा हायवेपासून 16 किलोमिटर आत जंगलात आणुन सोडले आहे. संतोष शिंदे व गौरव तीन दिवस पाच किलोमिटर अंतर पायी चालून जेवायला जात होते. आमच्या पाठी मंदारची पुण्याई असल्याने त्याच्याच होस्ट फार्मरकडे पोटा पाण्याची कायमस्वरुपी सोय झाली आहे.


इथले लोक लागेल ती मदत करणारे, चांगले आहेत. मायाळू आहेत. वातावरणही चांगले आहे. जिकडे पहावं तिकडे हिरवी दाट झाडी. सतत कोसळणारा पाऊस आणि उंचच उंच टेकड्या. सुंदर तरीही भयाण... पावलो पावली आढळणारे साप आणि झाडांवरुन पळणारे मोठे विंचू झाडावरुन कधी खाली पडतील याचा नेम नाही. ज्या गोष्टी कधी काळी ऐकल्या होत्या त्या आज अनुभवतोय.


खरं सांगू तू मला कसंही समज, पण येथिल माणसं खरच फणसासारखी आहेत. त्यांच्या ऐकत रहाव्यात अशा एकाहून एक सुरस अंधश्रद्धा. ही थंड हवा, चक्का झाडांवर राहणारे विचू, साप, विजांचे कडकडाट आणि लोड शेडींगमुळे असणारा कायमचा अंधार. काळं सुख म्हणजे काय ते कळतंय आज...


प्रत्यक्ष भेट आता लवकर शक्‍य नाही. शिवाय कल हो ना हो. आणि फोनवर माझा विश्‍वास नाही. इथे तो वेगळाच किस्सा आहे. म्हणून हा पत्रप्रपंच. शिवाय मुड आहे लिहायचा म्हटलं कुणाला लिहावं... म्हणून तुम्हाला. गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली. सोबत आमचा सध्याचा पत्ता देत आहे. एखादीला वेळ मिळालाच तर लिहा पत्र नाही तर आहोतच आम्ही आणि आमचा रावे.


शेवटी अक्तरभाईंच्या शब्दात सांगायचं तर...


हर घडी बदल रही है रुप जिंदगी
छांव है कभी, कभी है धुप जिंदगी
हर पल यहॉ, जी भर जिओ
जो है समा, कल हो ना हो...

पारगाव, सरळगाव ते सावर्डे

19.6.2005
आज रवीवार. महाराष्ट्रात सर्वत्र ग्रामपंचायत निवडणूकांचा धुमाकुळ चाललाय. माझ्या मनाप्रमाणेच...जवळ जवळ दोन महिन्यांनंतर आज लिहितोय... कशी कोठून सुरवात करावी, कळत नाही आणि पेनही वळत नाही.
सहाव्या सेमची थिअरी संपल्यानंतर दत्ता शेटे व मी शैलेश घुलेची ऍम्बीशन घेवून कर्जतला संशोधन केंद्रात डॉ. राव सरांना भेटायला गेलो. सहाव्या सेमच्या हॉर्टीच्या दोन्ही प्रॅक्‍टिकलला ते एक्‍सटर्नल होते. व्हायवाच्या वेळी त्यांनी फ्रूट प्रोसेसिंगविषयी माहिती दिली होती. दत्ता व माझ्यासाठी फळप्रक्रीया क्षेत्र सर्वोत्तम आहे, असे त्यांचे मत होते.
पदवीनंतर नोकरीमागत फिरण्यापेक्षा तुम्ही फळप्रक्रीया उद्योगात स्वयंरोजगार निर्माण करुन उद्योजक कसे बणू शकता, हे त्यांनी आम्हाला पटवून सांगतिले होते. त्यांचे अधिक मार्गदर्शन मिळावे, धुक्‍यातील वाट स्पष्ट व्हावी म्हणून आम्ही त्यांना पुन्हा पुन्हा भेटलो. डॉ. रावांनी पुणे येथिल फ्रूट प्रोसेसिंग या क्षेत्रातील महारथी डॉ. एस. एम. नायकरे यांचा पत्ता देवून त्यांना भेटायला सांगितले.
नायकरे सरांनी मद्रासमधून फुड सायन्समध्ये डबल पी.एचडी केली आहे. नॅशनल ऍग्रीकल्चरल रिसर्च प्रोजेक्‍ट गणेशखिड, पुणे चे ते अनेक वर्षे प्रमुख होते. सध्या त्यांचा पुण्यात स्वतःचा मोठा फळप्रक्रीया प्रकल्प आहे. त्यांच्या हाताखाली मार्गदर्शन घेवून ट्रेन होण्यासाठी अनेक जण पैसे देवून तयार असतात. नायकरे सरांना भेटल्यावर ते तुम्हाला महिना दोन महिन्यात माझ्या सांगण्यावरुन ट्रेन करतील, असेही डॉ. राव यांनी सांगितले होते. माझा डॉ. नायकरेंना भेटण्याचा उद्देश स्पष्ट आहे. घरच्या कांदा, टोमॅटो आदी कच्च्या मालावर प्रक्रीया करायची व हळूहळू उद्योगाची व्याप्ती वाढवायची. या दृष्टीने मी काय करु शकतो, याची मला चाचपणी करायची होती.
दरम्यान दत्ता व मी कर्जत-मुरबाड रस्त्यावरील एका सध्या सुरु असलेल्या प्रक्रीया उद्योगाला भेट दिली. तो खासगी प्रकल्प आहे. आदीवासी भागातून कैऱ्या, करवंदे, आवळा इ. कच्चा माल गोळा करुन त्यापासून ते आवळा, कॅन्डी, पन्हे, ज्युस, जॅम, जेली आदी पदार्थ बनवून ते मुंबईत उत्कृष्ट भावाने व मोठ्या मागणीने विकतात. खप एवढा आहे की मागणी पुर्ण होण्याएवढा पुरवठा होत नाही. याचा अर्थ या क्षेत्रात खूप वाव आहे.
13.5.05 ला लास्ट इअरच्या मुलांचा निरोप समारंभ होता. जेवढे जवळचे आहेत तेवढ्यांचे पत्ते इ. माहिती माझ्या स्लॅमबुकमध्ये घेतली. एखाद्याला बरं वाटावं म्हणून त्याच्याशी तोंडदेखलं गोड बोलणं मला आवडत नाही, जमतही नाही. त्यामुळे जे चार वर्षात कधी जवळ आले नाहीत, त्याचे ते जाताना एक दिवसापुरती विचारपुस करावी, हे पटेना. त्यांना बरे वाटावे म्हणून पुढे पुढे करणे मला शक्‍य नव्हते. अर्थात काळ कोणासाठी थांबत नाही. ज्या वळणावर ते काल उभे होते, तेथे उद्या आम्ही असू. आणि त्या वेळी मला फक्त तोडदेखले गोड बोलणारापेक्षा कधीही जवळ न आलेला दूर थांबलेला असतानाही आवडेल.
माझ्या मैत्रीच्या झोळीत हिरे किती आणि कोळसे व गारगोट्या किती हे मला माहित असलेच पाहिजे. त्यामुळे कॉलेज लाईफमध्ये जास्तीत जास्त जिवाला जीव देणारे मित्र जोडणे हे माझे ब्रिदवाक्‍य होते व राहील. याच मित्रांकडून मला वेळोवेळी माझी लायकी कळत राहीले.
14.5 ला मी घरी गेलो. 14.5 ते 12.6 हा महिन्याचा काळ कसा गेला ते कळलंच नाही. कांद्याची आरण तयार केली. ती भरली. उसाची सरी फोडली. वावार बांधले. पाणी भरले. सर्व बांधाच्या घाणी-गवत काढले. टोमॅटो लागवड, धना आदी कामे उरकता उरकता नाकी नऊ आले. सुनिल रोकडेला अडीच एकर ऊस वाट्याने दिला आहे. दरम्यान, सर्व नातेवाईकांना भेटून आलो. वडनेर, बेल्हे, पारगाव इ.
या महिन्यातील सर्वात मोठी घटना म्हणजे संतोष वरेचे लग्न. तारीख नक्की लक्षात नाही पण 22 च्या आसपास. त्याचा मिरवणूकीत मी माझ्या गावात भर चौकात पहिल्यांदाच दिवसा नाचलो. आंबरस पार्ट्या झोडून 12.6 ला सकाळी 11 वाजता मी एम एच 14, डब्लू 1208 घेवून सरळगावला निघालो. दादा कॉलेजला आता गावापर्यंत सायकलवर व तेथून एस.टी.ने जातील.
नारायणगावहून राजा पडवळ व मी सव्वा वाजता सरळगावला आलो. 13.6 ला रावेचे रजिस्ट्रेशन केले. 13 व 14 ला सोमवार मंगळवार सर्व मित्र मैत्रिणींच्या भेटी गाठी व रावेचे ओरिएंटेशन झाले. 15 ला सकाळी मी व मंदार आणि सुदर्शन तिवटे रत्नागिरीला जायला मोटारसायकलवर निघालो. बाकी सर्व मुलं ट्रेनसाठी पहाटे चार वाजताच कल्याणला रवाणा झाली. मुली सरळगावातच थांबणार आहेत. सकाळी पाच वाजता निघालेलो आम्ही मजल दरमजल करत सावर्डेला पोचलो तेव्हा दुपारचे एक वाजले होते. निवांत 60-65 च्या स्पीडने चहा, नाष्ता घेत आल्यामुळे सरळगाव ते सावर्डे हे 400 किलोमिटरचे अंतर कापायला आम्हीला 8 तास लागले.
दुपारी अडीच वाजता हॉर्टिकल्चर कॉलेजवर रिपोर्टिंग केले. संध्याकाळी सावर्डेच्या इनडोअर स्टेडीअममध्ये मुक्काम पडला. कॉलेज ऑफ हॉर्टिकल्चर खरवते-दहिवली, ता. चिपळून, जि. रत्नागिरी. या कॉलेजने रावेच्या मुलांना बाईक वापरायला बंदी घातली आहे. पकडले तर गाडी जप्त किंवा रावेत फेल करण्याचा दम देत आहेत.
16.6 ला सकाळी आम्हाला गावे दिली. मुलांना कॉलेजच्या टेम्पो मधून त्या त्या गावात ड्रॉप केले. प्रथम धायगुडेचा गृप वडेरु गावात, नवलेचा गृप नायशी, अकलूजकर - खिरशेत, गौरव - आंबतखोत, आबा सांगळे - नांदगाव, आम्ही - येगाव, गोएंका - कुटेरमध्ये दाखल झालो. बाकीच्यांची अजून माहीती नाही. ती उद्या रिपोर्टिंगला गेल्यावरच कळेल. दर सोमवारी डेली व विकली डायरीचे रिपोर्टिंग कॉलेज सेंटर वर असेल.
आम्ही या कॉलेजपासून 30 किलोमिटर तर मुंबई गोवा हायवेपासून 15 किलोमिटर आत जंगलात आहोत. आम्ही सध्या येगाव गावचे सरपंच पदाचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार आप्पा चव्हाण यांच्या घरी आहोत. आज खोली मिळालीये. संध्याकाळपर्यंत शिफ्ट होवू. जेवणाची सोय दिलीप चव्हाण (मंदारचे होस्ट फार्मर) यांच्याकडे झाली आहे. 900 रुपये महिना... दोन वेळचे जेवण व एक वेळ नाष्ता आणि चहा असे ठरले आहे.
आप्पांचा 15 एकर ऊस आहे. तीन एकर नारळ आहेत. बराचसा भात आहे. 20 म्हशींचा गोठा नुकताच बांधुन तयार झाला आहे. लवकरच या गोठ्यात मुऱ्हा म्हशी दाखल होतील.

रावे

29.4.2005
आज सहाव्या सेमची सर्व प्रॅक्‍टिकल्स संपली. सोमवार 2.5 पासून थेअरी सुरु होत आहे. सर्व प्रॅक्‍टिकल्स एकदम सोपी गेलीत. 19 पासून प्रॅक्‍टिकल सुरु झाली होती. 18 तारखेला आळेफाट्याला जावून दादांकडून 8500 रुपये आणले होते. त्यातील 6000 कॉलेजला भरले. 500 रुपये ताईला दिले. 2000 मागील उधारी दिली. आता उद्या घरी चाललोय.

मला या सेमला अजून 4000 रुपये कॉलेज फी साठी व 1000 रुपये इतर खर्चासाठी हवे आहेत. यानंतरही 5000 रुपये फी पुढच्या सेमच्या वेळी भरणे बाकी राहील. म्हणजे मला रजिस्ट्रेशनच्या वेळी 25000 रुपये लागतील. रावेला गाडी तर अत्यावश्‍यकच आहे. दादा पॅशन घेवून जा म्हणालेत. त्यामुळे ती काही काळजी नाही. सध्या तरी टाके, मोरे, मंद्या, मी, धायगुडे व घंगाळे असा गृप ठरला आहे. पाहू काय होतेय ते...

आज संध्याकाळी दुसऱ्यांदा उषाची भेट घेतली. आयुष्यात पुन्हा भेट होईल की नाही, देव जाणे. स्मिता हांडेकडे स्लॅम बूक लिहायला दिले. परवा संध्याकाळपर्यंत त्यांचेकडून लिहून होईल.
------------
11.4.2005
दुपारी घरुन आलो. घरी आर्थिक परिस्थिती अति बिकट आहे. माझी कॉलेज फी भरणे सध्या तरी शक्‍य नाही. म्हणून 15 पैकी 10 हजार आता भरायचेत. बाकी 5 हजार व पुढील सेमचे 15 हजार असे 20 हजार रुपये रावेच्या रजिस्ट्रेशनच्या वेळी भरणार आहे. 10 हजार रुपयांसाठी आजच दोन्ही गोऱ्ही बाजारात नेली आहेत.

ज्यांच्याकडून पैसे येणे आहे, त्यांच्याकडून काही येत नाही. ज्यांना देणे आहे, ते दम काढत नाहीत. दोन्ही आघाड्यांवर घाई असल्याने घरात तणाव. आईच्या डोक्‍याला ताप, दादांना मधुमेह. टेन्शन वाढल्यावर दादांचा त्रास वाढतो. बाहेरचे थोडे म्हणून की काय जवळच्या नातेवाईकांचाही ताप सुरु आहे. भरतसाठी दादांनी एवढे केले तरीही त्याच्या उलट्या बोंबा सुरु आहेत.
पैशाची, कामाची मारामार म्हणुन दादांनी त्याला पारगावला आणला. रोजावर कामाला ठेवला, माल वाट्याने दिले, खंडाने वावार दिले, स्प्लेंडर गाडी दिली. बायका मुलांच्या खान्यापिण्यापासून कपडे धुन्यापर्यंत सर्व कष्ट आईने उपसले. त्यांना काडीचाही त्रास न देता एवढे सगळे कमी म्हणून की काय हुंडेकरीत चार आणे न घेता वाटा दिला. सर्व मालाला भांडवल पुरवले. अनिलची घडी बसावी म्हणून 15 हजार रुपये खर्चुन दुकान घेवून दिले. शेवट काय तर सर्व दादांच्या बोकांडी. घरुन आला तेव्हा खिशात आणा नव्हता. सर्व दादांनी करुनही पुन्हा अजून काय पाहिजे होतं. हुंडेकरी फोडायला पुर्णतः तोच कारणीभूत आहे.
------
8.4.2005
आज शुक्रवार. उदया पाडवा आहे. म्हणून आजच घरी चाललोय. 19.4 पासून प्रॅक्‍टिकल एक्‍झाम सुरु होतेय. सध्या जर्नल कंपलिशन व असाईनमेंट कंप्लिशन सुरु आहे. सोमवारी कॉम्प्युटर जर्नल असाईनमेंटसह सबमिट करायचे आहे. दोन्ही कंपलिशनसाठी घरी घेवून चाललोय. सोमवारी सकाळी परत येईल.

मेन प्रॉब्लेम इकॉनॉमिकल आहे. कॉलेज फी 15000, रियाज 250, धायगुडे 50, टाके 250, धुमाळ 500, चालू महिन्याची मेस 500, चालू व पुढील महिन्याचे रुम भाडे 500, नाष्त्यासाठी 300 व इतर 250 अशा एकूण 17600 रुपयांची गरज आहे. म्हणजे राऊंड फिगर मला 18000 रुपयांची गरज आहे.काय होईल कुणास ठावूक पण पैशाची सोय झाली तर बरेच आहे.

एमएससीआटीमध्ये मी आमच्या मायक्रोबेस कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये पहिला आलो. टाके कडून सगळ्यांना फार अपेक्षा होत्या. त्याला 69 पडले. वारेला 67 व दत्ता शेटेला 58 पडले. अजून काय लिहू....

मंदार नेहमी म्हणतो, की सरळगावात मी खुप काही शिकलो. माणसे ओळखायला शिकलो. काय सांगू मंदार, मला माणसे कधी ओळखताच आली नाहीत. कधी ओळखता येतील देव जाणे. आई नेहमी म्हणते की भावड्या तू भोळा आहेस. हो मी भोळा आहे. पण या भोळ्याला तु, धायगुडेने आयुष्याच्या प्रत्येक वळणावर साथ दिली तरी पुरे आहे. जशी आज दिलीस. आजच्या दिवसासाठी थॅंक्‍स. थॅंक्‍स फॉर 8.4.05, शुक्रवार.
-----------
4.4.2005
आज सोमवार. आज माझी एमएससीआयटीची परिक्षा झाली. आजच्या दिवसाचा महोत्सव झाला. 80 पैकी 71 मार्क मिळाले. त्यात 20 ची भर पडून 100 पैकी 91 मार्क होतील. आज परिक्षा दिलेल्यांपैकी जगूला 62 व सतिश काकडेला 62 मार्क मिळाले. माझे थेअरीचे 9 प्रश्‍न चुकले.

एनएसएस कॅम्पचे दिवस

31.3.2005


आज महिनाअखेर. या महिन्याने मला माझ्या जिवनातील अत्यंत अविस्मरनीय क्षण दिलेत. विशेषतः हा शेवटचा आठवडा. कॅम्पचे 24 ते 29 पर्यंतचे दिवस व आजचा दिवस. 29 मार्च 2005 हा दिवस माझ्या आयुष्यातील अत्यं अविस्मरणीय दिवस आहे. या दिवशी मी आयुष्यातले पहिले गित (गं साजणे) स्टेजवरुन गायले व नकळत एक चुक या नाटकात जगदिशच्या वडीलांचा रोल केला. स्मिता हांडे जगदीशची आई झाली. स्टेज परफॉर्मसची ही पहिलीच वेळ. बाजी मारली.


नाटकाच्या तालमींना धमाल आली. (खरे तर रियाजला स्मिताच्या नवऱ्याची म्हणजेच जगदिशच्या बापाची भुमिका करायची होती. मात्र त्याला जमेना व स्मिताला दुसरा कोणी नवरो शोभेना म्हणुन जग्याच्या आग्रहाखातर ती अतिरिक्त जबाबदारी माझ्या बोकांडी पडली... त्यात माझ्या "तुम्ही आम्ही आपण सगळेच' या नाटकाचे भुसकाट पडले तो भाग वेगळा).


कवी गोपाळ वेखंडे यांच्यासमोर सादर केलेली "रानवेडा' ही माझी कविता. "हायवे' या माझ्या कथेला रुपा व अस्मिताने दिलेली उत्स्फूर्त दाद. कॉम्प्युटरच्या पाटील सरांनी माझ्यासाठी फेटा मिळवायला केलेली धडपड, सर्व मुलींशी झालेली फ्रेंडशिप इ.29 ला संध्याकाळी गॅदरिंग झाले. दोन दिवस प्रॅक्‍टिस करुन आम्ही नाटके उभी केली. मी माझ्या डॉन गृप कडून माझे स्वलिखीत "तुम्ही आम्ही आपण सगळेच' हे नाटक बसवले. तर जगदीशच्या नकळत एक चुक मध्ये भुमिका केली. मनाच्या धुंदीत व गं साजणे ही दोन गाणी घेतली होती. वेळेअभावी मनाच्या धुंदीत रद्द झाले.


त्यानंतर आजचा दिवस. हा ही असाच अविस्मरनिय. मंदारबरोबर फिरायला गेलो होतो. योगायोगाने रुपेश व रोशनने मंदारला त्याच्या लिहेपाड्यातील मैत्रिणीने बोलावल्याचे सांगितले. तेव्हा तिच्या घरी गेलो. उषा लिहे. मला तर ती दोन्ही रुपांसारखी भासली. तिची ही पहिली भेट मी विसरेल असे वाटत नाही. खंत एकच आहे की ही फ्रेंडशिप फार अल्पजिवी ठरेल. कारण ती तिच्या सासरी जाईल. पण फ्रेंन्ड कशी असावी, याचा ती एक आदर्श नमुना आहे.


------------


26.3.2005


आज शनीवार. कॅंपचा तिसरा दिवस. 24 तारखेपासून एनएसएस कॅम्प सुरु झालाय. रविवारी 23 ला संध्याकाळी हलपतरावच्या पिक अप मध्ये सर्व खोरी, फावडी फार्मवर नेवून ठेवली. तेथून मी, मोरे सर, नलावडे सर व डिप्लोमाचे पाटील सर मंडप, स्पिकर व आचारी पाहण्यासाठी गावात गेलो. आमच्या बरोबर डिप्लोमाचा शिपाई सुनिल माळी होता.


तेथिल मंडळाच्या लोकांना भेटल्यावर त्यांनी 15 बाय 30 चा मंडप, एक मशिन, दोन माईक, टेप, साऊंड बॉक्‍स, स्वयंपाकाची भांडी सात दिवसांसाठी 3500 रुपयांना भाड्याने दिली. आचाऱ्याचे वेगळे 800 रुपये ठरले. तसेच येथून पुढेही काही मदत लागली तर मदत करण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले. मंडळाच्या लोकांनी तुम्ही आम्हाला आमच्या शेतावर भाजीपाला, भेंडी इ. विषयी मार्गदर्शन करावे अशी मागणी केली. ती मोरे सरांनी मान्य केली. चहा घेवून रात्री सव्वा नऊ वाजता आम्ही रिक्‍शा करुन सरळगावला आलो.


जेवून पुन्हा 10 वाजता जीपमध्ये मंडपाचे सामान व भांडीकुंडी घेवून खुटलला फार्मवर गेलो. पहाटे चार वाजेपर्यंत मंडप बांधून रात्री पुन्हा रिक्‍शाने परत सरळगावला आलो. मंडप बांधायला मी, राहूल ढगे, विवेक शेलीमकर, युवराज लांडे, सुधाकर सहाणे, मुकेश ठाकरे, रुपेश आहेर, रोशन देवरे, तुषार काळे, श्रीकांत म्होपरे, राजू पडवळ होतो.


दुसऱ्या दिवशी पुन्हा सकाळी सात वाजता उठून साडेसातला फार्मवर पोचलो. एकूण चार मुलींसह 57 जण कॅम्पमध्ये आहोत. पहिल्या दिवशी फार्म भोवतीची सफाई व रस्त्याचे काम झाले. दुपारच्या कार्यक्रमात रुपेश-रोशन व मोरे सरांची बाचाबाची झाली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी चिक्कूची आळी बनवली. रस्त्याचे खड्डे बूजवून सपाट केले. फार्म हाऊसला कुंपन केले.


संध्याकाळी माळी व मोहिते मॅडम फस्ट, सेकंड व लास्ट इअरच्या मुली, जे. बी. पाटील सर, त्यांचे भाऊ, मेव्हणे, बढेकर सर कॅम्पमध्ये आले. बढेकर सरांचे उद्योगशिलतेवर व्याख्यान झाले. त्यानंतर आमचा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम झाला. मी लिखीतकर सर व ज्युनियर सरोदे सरांची नक्कल केली. शेवटी रात्री होळी साजरी केली. संध्याकाळी पुन्हा योगेश कडू, रवी बोरकर, परमेश्‍वर गाडे व हरिश गोएंकाची बाचाबाची झाली.


आज सकाळी रस्त्याचे काम करुन झाडांना बोर्डो पेस्ट लावली. दुपारी व्यक्तिमत्व विकासाचा कार्यक्रम झाला. प्रत्येकाने पुढे जावून काहीतरी बोलायचे होते. कार्यक्रम छान झाला. दररोज एका गृपकडे नाष्ता व जेवणाची जबाबदारी आहे. उद्या आमच्या डॉन गृपकडे सगळी जबाबदारी आहे. आमच्या गृपमध्ये मी (टीम लिडर), योगेश कडू, सुधाकर सहाणे, धनेश धुमाळ, युवराज लांडे, मुकेश ठाकरे, विजय गोरे, विवेक शेलिमकर असे आठ जण आहोत.


आता रात्रीचे साडेबारा वाजलेत. अजून मला दाढी करायची आहे. कपडे धुवायचेत. आजच दाढीचे सामान, रेझर, ब्लेड, तुरटी, विको 90 रुपयाचे आणले आहे. आता फक्त 25 रुपये शिल्लक राहीले आहेत. 250 रुपये एनएसएससाठी (ज्यात जेवण, प्रवास भाडे इ. आहे) भरले आहेत.


आता झोपा भाऊ.


गुड नाईट.


------------


16 मार्च 2005


सध्या माझा इकॉनॉमिक बॅलन्स पूर्णपणे ढासळलेला आहे. 15-4 पासून एंड सेमिस्टर सुरु होतेय. अजून कॉलेज फी 15 हजार रुपये भरणे बाकी आहे. 27-3 ला एमएस-सीआयटी एक्‍झाम आहे. त्याचे 1000 रुपये भरणे बाकी आहे. मित्रांचे उसणे घेतलेले पुढीलप्रमाणे देणे आहे... धायगुडे 250, रियाज 100, मोरे 100, मंद्या 150, धुमाळ 500, टाके 250, मधुकर ठमके 250, भरत पतंगराव 100दादांनी शनिवारी घरी बोलवलंय. सोमवारी परत येईल. तेव्हा कॉम्पूटरचे 1000 व धुमाळ आणि टाके सोडून बाकीचे 1000 लवकरात लवकर जमा करावे लागतील. पाहू काय करता येईल ते...


बी कंटिन्यू...


काल रात्री पतंगराव केवीलवाने तोंड करुन मुले पैसे देत नाहीत आता घरी जायला पैसे नाहित म्हणत होते. म्हणून मी त्यांना 100 रुपये होते. नंतर कळले की माझ्या आधी ट्रिपल एस ने त्यांना 200 रुपये दिले होते. मी लगेच त्यांच्याकडून 100 रुपये परत घेतले. तात्पर्य काय तर एखाद्याने कितीही केविलवाणेपणा दाखविला, अडचणीत आहे असे भासवले तरी भावनेच्या आहारी जावून त्यावर भोळा विश्‍वास टाकू नये... संत्या निट लक्षात घे नाही तर पावलोपावली फसशील.


-------------

रविवार ५ डिसेंबर २०१०

ताऱ्यांची धुळ मार्च 2005

11 मार्च 2005

परिक्षेला फक्त दोन दिवस राहिलेत. आमि अजूनही मिड चा अभ्यास सुरु झालेला नाही. आत्ताच कॉम्प्यूटरचे जर्नल पूर्ण झालंय. जुनीयर पोरांनी जर्नल पूर्ण करायला नेलं होतं. मात्र रवी बोरकर आणि कंपनीची जर्नल फस्ट इअरच्या होस्टेलला पकडली. त्यामुळे आमची कब्बडीची जुनीयर पोरं घाबरली. त्यांनी काही जर्नल परत केली.

रात्रीचे 1.30 वाजलेत. आज सकाळी हॉर्टीचे प्रॅक्‍टीकल ऍण्ड ऍग्रो ची थिअरी झाली. दुपारी दोन ला हॉर्टी चे लेक्‍चर होते. ते बुडवले. एंटो चे प्रॅक्‍टीकल केले. सॅंडी जाधव सर होते. ते म्हणाले की तुम्ही इथं वापरता एवढी प्रयोगाची साहित्ये गर्व्हमेंट कॉलेजमध्येही वापरायला मिळत नाही. आम्हालाही नव्हती. थिअरी पण निट शिकवली जात नाही. आपलं आपल्यालाच करावा लागतो सगळा अभ्यास.

त्यावर मी म्हणालो, सर गर्व्हमेंट कॉलेजची मुलं हुशार असतात. त्यावर सर म्हणाले, हुशार बिशार असं काही नाही. फक्त हुशारीने काहीही साध्य होत नाही. तर कष्टाने होते. प्रत्येक हुशार मनुष्य यशस्वी होत नाही. पण कष्ट करणारा प्रत्येक मनुष्य यशस्वी होतो. मग तो हुशार नसला तरी. कोणाचेही उदाहरण पहा. मग तो जॉर्ज काव्हर असो की एकादा शास्त्रज्ञ किंवा विद्यार्थी. जो कष्ट करेल त्याला फळ मिळते.

तेव्हा सरांनी हरीतक्रांतीचे जनक डॉ. नॉरमन बोरलॉग यांचे एक वाक्‍य सांगितले की, - आकाशातील ताऱ्यांकडे आशेने पहा व त्यांना पकडण्यासाठी त्यांच्याही पुढे हात पसरा. ते जरी हाती आले नाहीतत तरी त्यांची धुळ तरी मिळेल.

इंग्रजीची ऐसी तेसी मार्च 2005

10 मार्च 2005

आज गुरुवार. सोमवारपासून (14) मिड टर्म सुरु होतेय. सध्या जर्नल कम्प्लिशन सुरु आहे. Now, from today i will continue my study of mid term exam regularly. Three days before mid, are quite sufficent for preview. Just now I have try to complite computer journal, up to first five experiments.

final exam will start from 15 april. i.e. 1 month after mid. my ms-cit exam on 27 march at murbad. NSS camp already arrened on 18 to 25 march at khutal farm. becouse of these all activities my shedule from today to 15 may i.e. up to complit this sem, are too busy. Becouse of this, it may be not possible to go the home for 3-4 days, for villae fair.

Their are major economic problem to me. becouse, tushan fee Rs 15000 are also remain in collage 1000 Rs of Microbase computer Institute, 250 Rs of Riyaj Inamdar, 250 Rs of Santosh Dhygude, 200 Rs of vishal More. Mid started after 3 days & i cant bay notes becouse of MS (mouny shortage). Notes require Rs 250 i.e. i have requiredtotal rs 3000 incliuding patangraves mase bill, redusing 15,000 college fee, i can try to call father with 3000 Rs in 13/3/05

i can try to write diry in english started from now becouse of to increase camand on engglish & also becouse of derty handwriting in marathi. I have enjoy the college life in this last semister. Next semister is rave at away from college. which braeks the contact of college with me. & last 8th sem is the tentionfull sem, tension of future life & future plans. so, this sem is the last sem of joy. & i can try to make everyday as a memorial day.

on tusday, mahashivratra date 8/3/05 we (rajiv, take & I) has go to the sangameshwar & also at visawa resort. to see the rose garden. An excelent rose garden developed their. nearly equal to the 450 species of rose which are fully filled with the flowers. flower, red white, pink & so on colour. all type of roses. their are heaven of roses. their are no words to catch the buity of that garden. their are much filmstars like varsha usgavkar & others visit to this resort. I cant see te whole resort, only rose garden. but next time, i have sure that i will not only see the total resort but also test it.

what can i tell about sangam & tempel spot of sangameshwar.we go to the sangam by jeep up to reaver. & at the time of back from sangam to visawa, come one-two-one-two-one-two. at visawa we has welcomed by rain. after visiting visawa we went to room at 1.00 pm. today i will call to the home about payment.
Good Night.