1) जगात सर्व गोष्टी मानसाला योग्य वेळी कळतात. झाडांना काही पानांबरोबर फुले व फुलांबरोबर फळे येत नाहीत.
2) मानुस शरीरावर प्रेम करतो. त्या प्रेमाला अंत नसतो. पण शरीर काही त्याच्यावर असे प्रेम करत नाही. प्रसंगी ते त्याचे वैर साधते.
3) सुंदर दिसणाऱ्या आणि गोड असणाऱ्या फळात किड आढळते. जिवन असेच आहे. ते सुंदर आहे, मधुर आहे. पण त्याला केव्हा कोठून किड लागेल याचा नेम नसतो.
4) जिवनाचं रहस्य नेहमीच गुहेत लपलेलं असतं. त्या गुहेच्या दारातून आत जावून आतल्या काही न दिसणाऱ्या अंधारातून आपल्यापैकी प्रत्येकाला हे रहस्य स्वतःच शोधून काढले पाहीजे.
5) मानवी मनाची आणि जिवनाची गुंफण मोठी विलक्षण आहे. त्यामुळे सुख हा अनेकदा मृगजळाचो शोध ठरतो.
6) सुख ही दुखःची छाया आहे, की दुःख ही सुखाची सावली हे न उलगडलेलं कोडं आहे.
7) रुपवती स्त्री जशी विनयानं शोभून दिसते. तसेच अर्थ आणि काम हे धर्माच्या संगतीत सुंदर वाटतात.
8) या जगात जन्माला येणारा प्रत्येक जीव शापीत असतो. कुणाला पुर्वजन्माचं कर्म भोवतं, कुणाला आई बाबांच्या दोषाची फळं चाखावी लागतात, कुणी स्वभावदोषामुळे दुःखी होतात तर कुणाला परिस्थितीच्या शृंखलात बद्ध होवून जिविताचा प्रवास करावा लागतो.
9) जिवन हा अनेक शापांनी युक्त असा एक वर आहे.
10) मृत्यू हे एक मोठे अस्वल आहे. कितीही उंच झाडावर चढून बसले, तरी ते मानसाचा पाठलाग करते. कुठेही लपून बसा, ते काळे कूरुप प्रचंड धुड आपला वास काढत येते. त्याच्या गुदगुल्यांनी प्राण कंठाशी येतात.
11) मृत्यू हा अष्टौप्रहर अश्वमेध करणारा विजयी सम्राट आहे. याला जगात कोणी विरोध करु शकत नाही.
12) लज्जा हा सौंदर्याचा अलंकार आहे. सत्याचा नाही. सत्य हे नग्न असते. नुकत्याच जन्माला आलेल्या बालकाप्रमाणे.
13) बायकांचं लक्ष पुरुषाच्या जिभेकडं नसतं, ते डोळ्यांकडे असतं !
14) मानसाने जिवनाच्या मर्यादा कधी विसरु नयेत.
15) यौवन म्हणजे वार्धक्यातली पहिली पायरी. मृत्यू ही वार्धक्याची शेवटची पायरी.
16) वृक्षवेलीची मुळे जशी जवळच्या ओलाव्याकडे वळतात, तशी मानसे सुखासाठी निकटच्या लोकांचा आधार शोधतात. याचाच जग कधी प्रेम म्हणतं. कधी प्रिती तर कधी मैत्री पण खरोखरच हे आत्मप्रेम असते.
17) द्वंद्वपूर्ण जिवणात तत्वज्ञान हाच मानवाचा अंतिम आधार आहे.
18) या जगात जन्माला येण्याचा एकच मार्ग आहे. पण मरणाचं तसं नाही. तो अनेक वाटांनी येतो. कुठूनही येतो.
19) मृत्यू हा जीवन मात्राला जितका अप्रिय तितकाच अपरिहार्य आहे. तो सृष्टीच्या जन्मानइतकाच नाट्यपूर्ण आणि सहस्यमय भाग आहे.
20) सौंदर्याची पुजा हा "स्त्री'चा धर्म आहे. ती कुठल्याही सुंदर वस्तूचा नाश करु शकत नाही.
21) जो घाव घालतो, त्याला तो विसरुन जाणं सोपं असतं. पण ज्याच्या कपाळावर घाव बसतो, त्याला त्याचा कधीच विसर पडत नाही.
22) प्रिय व्यक्तिचा तिच्या दोषांसह स्विकार करण्याची शक्ती खऱ्या प्रेमाच्या अंगी असते. असली पाहिजे.
23) जिवनात प्रेम ही एक उच्च भावना आहे. पण कर्तव्य ही तिच्यापेक्षाही श्रेष्ठ अशी भावना आहे.
24) आपल्यासाठी दुसऱ्याच्या डोळ्यांत आलेले अश्रू पाहण्यात अपूर्व आनंद असतो.
25) डोळ्यांत अश्रू येणे हे दुबळ्या मनाचे लक्षण आहे.
26) विचारांच्या सहाय्याने विकारांवर विजय मिळविण्यातच खरा पुरुषार्थ मनुष्यधर्म आहे.
27) दैव मोठं लहरी आणि निर्दयी आहे. ते एका क्षणात आकाशातील उल्केला पृथ्वीवरला पाषाण करुन सोडते.
28) कुणाचंही दुखः असो. ते कळण्याचा मार्ग या जगात एकच आहे. तो म्हणजे त्याच्या जागी आपण आहोत, अशी कल्पना करणे.
29) जी नदी तहानेनं व्याकूळ झालेल्या मनुष्याची तृष्णा शांत करते, तिच पुढे खोल पाण्यात गेला की त्याचा प्राण घेते.
30) ज्याचा आत्मा स्वार्थाच्या वासनांच्या आणि भोगांच्या आहारी जातो, तो मनुष्य या जगात सदैव दास्यात खितपत पडतो.
31) स्त्रीयांच्या बरोबर चिरकाल स्नेह राहणं शक्य नसते. कारण त्यांची ह्दयं लांडग्याच्या हृदयासारखी असतात.
32) पापाचा विषवृक्ष विश्वव्यापी असतो. त्याची पाने मोहक दिसतात. त्याची फुलं धुंद करुन सोडतात. पण त्याची फळं.... त्याच्या प्रत्येक फळात तक्षक लपुन बसलेला असतो. त्याचा दंश कुणालाही केव्हाही होवू शकतो.
33) दुःखाचे सात समुद्र ओलांडल्याशिवाय आनंदाचे कधीही न सुकणारे फुल मानसाला मिळू नये, असा जिवनाचा नियम आहे की ?
34) मानुस हा देव आणि राक्षस यांचा विचित्र संकर आहे.
35) संयोग आणि वियोग यांच्या अद्भुत रसायनालाच जीवन म्हणतात का ?
36) समुद्राच्या किनाऱ्यावर लहान मुलं वाळूचा किल्ला बांधतात. भरतीची एक लाट येते आणि तो किल्ला कुठच्या कुठं नाहिसा होवून जातो. त्या वाळूच्या किल्ल्यापेक्षा मानसाचे जीवन काय निराळे आहे ?
37) जे जीवन वाट्याला आलं आहे, ते आनंदानं जगणं... त्या जिवनातील रस किंवा सुगंध शोधनं, तो सर्वांना आनंदानं देणं हा सुखी होण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे.
38) निराशेपेक्षा खोटी आशा फार वाईट असते.
39) जिवनाच्या जमा खर्चात उधारीला जागा नाही. जो आज सुगंधी फुलांचा वास घेत नाही. त्याला तो उद्या मिळेलच असे नाही. या जगात उद्याची सोनेरी सकाळ उगवेल, उद्याची सोनेरी फुले फुलतील पण त्या उद्याच्या जगात हा वास घेणारा असेलच असे नाही.
40) जीवन क्षणभुंगुर आहे. या जगात कोणत्या क्षणी मानसाला मृत्यू येईल याचा नेम नाही. म्हणून आपल्याला मिळणारा प्रत्येक क्षण हा मानसाने सुवर्णक्षण मानला पाहिजे. त्यातला रस, सुगंध आनंद अगदी कठोरपणे पिळून घेवून मानसाने आपली सुखाची तृष्णा शांत केली पाहिजे.
ययाती - वि. स. खांडेकर